-
डोंबिवलीत ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उत्साहात सुरुवात झाली आहे. (छाया सौजन्य- दीपक जोशी)
-
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डोंबिवलीत साहित्यिकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. (छाया सौजन्य- दीपक जोशी)
-
विचाराने आधुनिक होताना परंपरा जपणाऱ्या मुलींचा साहित्य संमेलनातील सहभाग लक्ष वेधून घेणारा आहे. (छाया सौजन्य- दीपक जोशी)
-
माणसाला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या ग्रंथांच्या मिरवणुकीत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला. (छाया सौजन्य- दीपक जोशी)
-
आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता जितकी आवश्यक, तितकीच मनावरील जळमटे दूर होणेदेखील आवश्यक, हा संदेश या दिंडीतून देण्यात आला. (छाया सौजन्य- दीपक जोशी)
-
नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असा संदेश या चिमुरड्यांनी उपस्थितांना दिला. (छाया सौजन्य- दीपक जोशी)
-
अखिल भारतीय साहित्य संमेलनातील क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह तरुणींना आवरता आला नाही. (छाया सौजन्य- दीपक जोशी)
-
जमाना ई-बुकचा असला तरी पुस्तके विकत घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही आणि तरुणाईदेखील याला अपवाद नाही. (छाया सौजन्य- दीपक जोशी)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती