-
अनेकांना पाण्याची भीती वाटते. 'बाळाला पाण्यापासून दूर ठेवा', हे तर ज्योतिषबुवांचं छापील वाक्य. हे ऐकताच काळजीपोटी आई आपल्या चिमुकल्याला पाण्यापासून दूर ठेवण्याचा सर्वस्वी प्रयत्न करते. परंतु, ऑस्ट्रेलियामधील दोन भारतीय महिलांनी चिमुकल्यांना पाण्याचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या वाढीसाठी मदत व्हावी म्हणून 'बेबी स्पा पर्थ' नावाचा 'बेबी स्पा' सुरू केला आहे. पालक अगदी तान्ह्या बाळालादेखील या स्पामध्ये घेऊन येतात. अनिता याप आणि कविता कुमार यांचा हा 'बेबी स्पा' सोशल मीडियावरदेखील प्रसिद्धी मिळवत आहे. हायड्रोथेरपी आणि बेबी मसाजमुळे बालकाच्या शरीराला आराम तर मिळतोच, त्याचबरोबर ते उत्साही आणि आनंदीदेखील होते. पाहा ही बाळं कशी आनंदात बेबी स्पाची मजा घेत आहेत. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
शास्त्रोक्त आणि नैसर्गिक पद्धतीने केलेला मसाज बाळाच्या शरीराला आराम देतो. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
बाळ दिवसभर पाण्यात डुंबत राहण्याची मजा घेऊ शकते. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
स्पामध्ये देण्यात येणारी हायड्रोथेरपी बालकाच्या इंद्रियांसाठी उपयुक्त ठरते. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
'बेबी स्पा'मध्ये येणाऱ्या बालकामध्ये आत्मविश्वास वाढल्याचे पाहायला मिळते. तर पालक आणि पाल्यामध्ये उत्तम जवळीक निर्माण होते. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
पाण्यात डुंबल्याने बाळामधील अस्वस्थता दूर होऊन त्याला चांगली झोप लागते. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी गरजेचा असा हा 'बेबी स्पा'. 'बेबी स्पा'मधील बालकं पाण्यात डुंबण्याचा आनंद घेताना. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
'बेबी स्पा'च्या रुपाने अगदी लहान वयापासूनच पाण्याशी संपर्क आल्याने पाण्यातील आव्हानांसाठी बालक आणि पर्यायाने पालकांनादेखील सज्ज होण्यास मदत होते. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
'स्पा'मध्ये मुलांना खेळण्यासाठी पाण्यावर तरंगणारी अनेक खेळणीदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
नियमित 'स्पा' घेणे, बालकाच्या रक्ताभिसरण आणि श्वसनक्रियेसाठी उपयुक्त ठरते. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
'बेबी स्पा पर्थ'मध्ये बालकाच्या कौशल्य आणि क्षमतेत वाढ होते. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
बाळाचे लाड करण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रकार या स्पाच्या निमित्ताने प्रचलित होताना दिसतो आहे. (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
'बेबी स्पा'मधील एका आनंदाच्या क्षणी तान्हुला! (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
मी नाही पाण्यातून बाहेर येणार… अशीचं काहीशी ही बालमुद्रा! (Source: Baby Spa Perth/Facebook)
-
'बेबी स्पा'चा आनंद घेतल्यानंतर गाढ झोपी गेलेली बालके. (Source: Baby Spa Perth/Facebook)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल