-
मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊन मनासारखी नोकरी न मिळाल्याने एका पुणेरी तरुणाने एक आगळावेगळा मार्ग शोधला आहे. अजित केरुरे या तरुणाने 'कडक स्पेशल भारतीय जलपान' हे चहाचे दुकान सुरू केले आहे.
-
आपले शिक्षण आणि प्रत्यक्ष जगणे हे एकमेकांपासून बरेच वेगळे असते हे एका अजितने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
-
इतकेच नाही तर त्याने आपल्या या दुकानात आपली इंजिनिअरींगची डिग्री लावून तिचा केवळ लग्न जमविण्यासाठी उपयोग होतो असे त्याखाली उपहासाने लिहीले आहे.
-
आपल्या दुकानाची रचना ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी योग्य पद्धतीने विचार करुन केली आहे. याबरोबरच याठिकाणी असणाऱ्या पुणेरी पाट्याही आपले लक्ष वेधून घेतात.
-
आता या चहाच्या दुकानात चहा, कॉफी, दुधाचे एकूण १० प्रकार आहेत. त्याशिवाय सरबतेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
-
याशिवाय त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना एक अतिशय भावनिक असे पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका