-
राजधानी दिल्लीत प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकांने नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणाऱ्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून भाजपावर टीका होऊ लागली आहे. जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं असून, दिल्ली भाजपा कार्यालयात प्रकाशन करण्यात आलं. त्यानंतर त्यावरून संतप्त टीका होऊ लागली आहे.
-
शिवसेना नेते खासदार संजय राऊत.
-
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकारवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही भूमिका मांडली आहे. या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे. -छत्रपती संभाजीराजे भोसले
-
-
छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आणि कार्य अतुलनीय आहे. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी त्याला महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करता येणार नाही. -अशोक चव्हाण
-
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपाच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. -धनंजय मुंडे
-
भाजपानं 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित केलं, ज्यात मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली आहे. ज्या महापुरूषाने आम्हाला आमची ओळख दिली त्यांचा अपमान भाजपाने केला. महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. ही तुलना करणं हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. या प्रवृत्तीचा निषेध. -राजीव सातव
संजय राऊत रुग्णालयात दाखल…