द्राक्षे अक्रोड रायतं – साहित्य : दीड ते दोन वाटय़ा साधं दही, अक्रोडाचे तुकडे, अर्धी ते पाऊण वाटी, वाटीभर द्राक्षे, दोन चमचे जिरं, पाव चमचा लाल तिखट, मीठ, साखर चवीनुसार कृती : दही छान घोटून घ्या आणि चवीनुसार साखर, मीठ घालून नीट ढवळून गार करत ठेवा. जिरं एका जाड बुडाच्या पॅनमध्ये अगदी मंद आचेवर चांगलं तपकिरी होईपर्यंत भाजा. जाडसर भरडं वाटून घ्या. अक्रोड चांगले फ्रेश हवेत. नसतील तर तेही जाड बुडाच्या पॅनमध्ये अगदी मंद आचेवर चारपाच मिनिटं शेकवून घ्या. नंतर एकाचे दोनतीन तुकडे होतील असे मोडून घ्या. द्राक्षं एकाची दोन अशी चिरून घ्या. आता दह्यंत द्राक्षं, अक्रोड, जिऱ्याची पूड घालून नीट हलवून घ्या आणि अगदी वर लाल तिखट पेरून थंडगार वाढा. ज्योती चौधरी मलिक (सौजन्य – लोकप्रभा) पेरूचं रायतं – साहित्य : २ मध्यम पिकलेले पेरू, अर्धा कप सायीचे गोड दही, २ हिरव्या मिरच्यांची पेस्ट, २ टेस्पून कोथिंबीर बारीक चिरून, १/८ टीस्पून मोहोरी पावडर, २ टीस्पून साखर (किंवा चवीनुसार), चवीपुरतं मीठ कृती : पेरू धुवून घ्या. देठाकडील भाग थोडा कापून टाका. पेरू वरवर किसा. गाभ्याकडील बियांचा भाग घेऊ नका. दही फेटून घ्या. त्यात किसलेला पेरू घाला. मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि मोहरी पावडर घाला. त्यात साखर आणि मीठ घाला. सर्व एकत्र करून चव पाहा. कोिशबीर खूप घट्ट वाटत असेल तर दोन टेबलस्पून दही किंवा दोन ते तीन टेबलस्पून दूध घाला. वाटल्यास थोडी साखर आणि मिरची घाला. ज्योती चौधरी मलिक (सौजन्य – लोकप्रभा) बटाटय़ाचं रायतं – साहित्य : २ मध्यम बटाटे, अर्धा ते पाऊण कप दही, १ हिरवी मिरची ठेचून, पाव कप कोथिंबीर बारीक चिरून, पाव टीस्पून जिरेपूड, २-३ चिमटी सैंधव मीठ, चवीपुरते साधे मीठ, १/२ टीस्पून साखर, १ चमचा साजूक तूप कृती : बटाटे उकडून सोलून लहान तुकडे करा. पॅनमध्ये तूप गरम करून बटाटय़ाच्या फोडी थोडे मीठ घालून गुलाबी परतून घ्या. दह्यत जिरेपूड, सैंधव मीठ, साधे मीठ, साखर, ठेचलेली मिरची आणि कोथिंबीर एकत्र करा. यात बटाटय़ाचे तुकडे घाला. पराठय़ाबरोबर हे रायतं छान लागतं. ज्योती चौधरी मलिक (सौजन्य – लोकप्रभा) भेंडी रायतं – साहित्य : पाव किलो मध्यम भेंडी, २ हिरव्या मिरच्या, १ कप दही, चवीपुरते मीठ, १ टीस्पून तेल, अर्धा चमचा मिरची पूड, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून जिरे, अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून, तळण्यासाठी तेल <b>कृती :</b> भेंडीची दोन्ही देठं कापा आणि भेंडीचे मध्यम तुकडे करा. हे तुकडे कुरकुरीत तळून घ्या. थंड झाल्यावर भेंडीवर मिरची पूड, मीठ घाला. लहान कढईत एक चमचा तेल गरम करून जिरे, मिरची आणि िहग घालून फोडणी तयार करून भेंडीवर घाला. चमच्याने एकत्र करा. भेंडी गार झाल्यावर दही आणि कोथिंबीर घालून एकत्र करा. – ज्योती चौधरी मलिक (सौजन्य – लोकप्रभा)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या