-
करोना व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात १४० प्रकल्प सुरु असून त्यात १३ पेक्षा जास्त लसी क्लिनिकल चाचणीच्या वेगवेळया टप्प्यांवर आहेत.
-
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ऑक्सफर्ड विद्यापीठ-अॅस्त्राजेनेका आणि अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीची लस निर्मितीमध्ये सध्या आघाडीवर आहेत.
-
अॅस्त्राजेनेकाने ऑक्सफर्डने विकसित केलेल्या ChAdOx1 nCoV-19 लसीची तिसऱ्या स्टेजची चाचणी सुरु केली आहे.
-
अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीकडून mRNA-1273 लसीची दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु आहे. जुलैच्या मध्यापर्यंत त्यांची तिसऱ्या टप्प्याची क्लिनिकल चाचणी सुरु होईल.
-
मॉर्डनाने १० कोटी लसीच्या डोसची निर्मिती करण्यासाठी औषध कंपनी कॅटालेंट बरोबर भागीदारी केली आहे. कॅटालेंटची जॉन्सन अँड जॉन्स आणि अॅस्त्राजेनेकाबरोबर भागीदारी आहे. या दोन कंपन्या सुद्धा करोनावर लसीची निर्मिती करत आहेत.
-
तिसऱ्या स्टेजमध्ये मॉर्डना ३० हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी करणार आहे.
-
-
प्रतिकात्मक छायाचित्र
-
करोनावर मात करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्त्राजेनेका यांनी बनवलेली लस लवकरच क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करणार आहे.
-
अंतिम टप्प्यात यूकेमध्ये १०,२६० प्रौढ आणि मुलांना या लसीचा डोस देण्यात येईल.
-
जर्मनीची बायोटेक फर्म क्यूअरवॅकने करोना व्हायरसवर लस बनवली असून त्यांनी मानवी चाचण्या सुरु केल्या आहेत. १६७ तंदुरुस्त स्वयंसेवकांपैकी १४४ जणांना लसीचे इंजेक्शन देण्यात येईल. क्यूअरवॅक ही लस निर्मिती करणारी दुसरी जर्मन कंपनी आहे.
-
रशियाने लिक्विड आणि पावडरच्या स्वरुपात करोनावर लस बनवली आहे.
-
चीनच्या नॅशनल बायोटेक ग्रुप म्हणजे सिनोफार्मने केलेल्या लस चाचणीतून अँटीबॉडीज तयार झाल्याचे म्हटले आहे. करोना व्हायरस विरोधात या अँटीबॉडीज तयार होणे खूप महत्वाचे आहे.
-
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना ब्रेक लागला होता.
-
सर्व काही सुरळीत झाले तर नोव्हेंबरपर्य़ँत करोना विरोधात बाजारात लस उपलब्ध होईल. ब्रिटन आणि अमेरिकेने ही लस विकसित करण्यासाठी कोटयावधी डॉलर्स खर्च केले आहेत.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट