मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना तीन मुलं आहेत. इशा आणि आकाश अंबानी जुळे आहेत तर अनंत अंबानी या दोघांपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. इशा आणि आकाश रिलायन्स जिओची जबाबदारी सांभाळतात. आकाश अंबानीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याच्या वडिलांनी कशाप्रकारे त्याला जिओ सुरु करण्यास आणि त्याच्यासाठी काम करण्यास प्रोत्साहन दिलं. आकाश अंबानीने टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीतून पदवी घेतल्यानंतर त्याला अमेरिकेतच राहायचं होतं. एके दिवशी वडील मुकेश अंबानी त्याला भेटण्यासाठी गेले आणि विचारलं की व्यवसायाविषयी काही विचार केला आहे का? त्यावर आकाशने अमेरिकेतच काहीतरी करण्याचा विचार असल्याचं सांगितलं. हे ऐकून मुकेश अंबानींनी आकाशला विचारलं की, तू दिवसभर इंटरनेटवर काय काय करतोस? त्यावर आकाश म्हणाला, "मी अभ्यास करतो, शिकतो आणि स्वत:च्या ज्ञानात भर पडेल असं काहीतरी वाचतो." आकाशचं उत्तर ऐकून मुकेश अंबानी त्याला म्हणाले, "भारतातील लोकांनीसुद्धा हेच करावं असं तुला नाही वाटत का?" आकाशने हो असं उत्तर दिलं आणि मुकेश अंबानींनी जिओ टेलिकॉमची सुरुवात करत त्याला भारतात बोलावलं. या घटनेच्या पुढच्या वर्षीपासून आकाश आणि इशा मिळून जिओची जबाबदारी सांभाळू लागले. आज जिओ हा देशातील सर्वाधिक वापरला जाणारा टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइडर आहे.

कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखाचा संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूप खास, म्हणाले…