-
विज्ञानाने मानवांना चंद्रावर नेलं, डीएनएचे कोड उलगडले पण आजही काही रहस्ये आहेत ज्यांची उत्तरे शास्त्रज्ञांना अजूनही सापडत नाहीत.(Photo Source: Pexels)
-
मानवी वर्तन, शरीर आणि निसर्गाशी संबंधित काही गोष्टींवर वर्षानुवर्षे संशोधन सुरू आहे, तरीही काही गोष्टींबाबत गूढ कायम आहेत. अशा सात प्रश्नांचा शोध घेऊया.(Photo Source: Pexels)
-
आपण स्वप्ने का पाहतो? : झोपेत असताना मेंदू अनेक कथा तयार करतो, कधी विचित्र, कधी भयानक आणि कधी सुंदर. पण विज्ञानाला अजूनही हे समजलेलं नाही की आपण स्वप्ने का पाहतो. काहीचं म्हणणं की आपल्या मेंदूच्या भावनांवर प्रक्रिया करण्याच्या आणि आठवणी साठवण्याच्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे. (Photo Source: Pexels)
-
आपण वृद्ध का होतो? : आपल्या पेशी कालांतराने कमकुवत होतात, पण प्रश्न असा आहे की, एखादी व्यक्ती पूर्णपणे निरोगी आयुष्य जगली तरीही वृद्धत्व का येतं? शास्त्रज्ञांना अद्याप याचं कारण सापडलेलं नाही.(Photo Source: Pexels)
-
व्हेल मासे स्वतःहून किनाऱ्यावर का येतात? : जगभरात अनेक वेळा असं दिसून आलं की डझनभर व्हेल एकत्र किनाऱ्यावर येतात आणि मरतात. शास्त्रज्ञांनी अनेक कारणे शोधली, परंतु त्यापैकी एकही कारण निर्णायकपणे सिद्ध झालेलं नाही. (Photo Source: Pexels)
-
लोक अलार्म वाजण्यापूर्वीच का उठतात? : तुम्ही कधी लक्षात घेतलं का की कधीकधी आपण अलार्म वाजण्यापूर्वी काही सेकंद आधी डोळे उघडतो? असं का घडतं? की हा फक्त एक योगायोग आहे? अद्याप हे गूढ उलगडलेलं नाही. (Photo Source: Pexels)
-
एक हात अधिक मजबूत का असतो? : जगातील सुमारे ९० टक्के लोक उजवे आहेत, तर उर्वरित डावे आहेत. पण आपलं शरीर एका हाताला दुसऱ्या हातापेक्षा जास्त का प्राधान्य देतं? आतापर्यंत कोणतंही ठोस उत्तर सापडलेलं नाही.
-
एकाने जांभई दिली तर दुसऱ्याला का येते? : जर तुमच्या जवळच्या एखाद्याला जांभई आली तर तुम्हाला काही सेकंदातच जांभई येऊ शकते. जर तुम्हाला एखाद्याचा जांभई येत असलेला फोटो किंवा व्हिडिओ दिसला तरही असे होऊ शकते. यांचं नेमकं कारण अद्याप अज्ञात आहे.

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका