-
जर तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर बँक तुम्हाला रिस्की ग्राहक मानते. या स्कोअरमधून तुम्ही मागे तुम्ही कशी परतफेड केली ते दाखवतो. वेळेवर कर्ज परत केलं नाही किंवा बिल भरलं नसल्यास तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो, ज्यामुळे कार्ड मिळवणे अधिक कठीण होऊ शकते.
-
प्रत्येक बँक क्रेडिट कार्डसाठी किमान उत्पन्न मर्यादा ठरवते. जर तुमचे उत्पन्न त्या मर्यादेपेक्षा कमी झाले तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
-
आधीच एका पेक्षा जास्त ठिकाणहून कर्ज घेतलेले असेल किंवा ईएमआय चालू असतील, तर बँकेला वाटते की तुमची आर्थिक स्थिती कमकुवत आहे आणि तुमच्यासाठी नवीन कर्ज फेडणे कठीण होईल.
-
बँका अशा लोकांना रिस्की समजतात जे सतत नोकरी बदलतात किंवा नुकतेच नवीन नोकरी रुजू झाले आहेत. या नोकरीच्या अस्थिरतेमुळे अर्ज नाकारले जाऊ शकतात.
-
जर तुम्ही अर्ज भरताना तुमची जन्मतारीख, पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती चुकवली तर बँक तुमचा अर्ज नाकारू शकते.
-
जर तुम्ही एकाच वेळी अनेक कार्ड घेतले असतील किंवा त्यासाठी अर्ज केला असेल, तर बँक तुमच्या आर्थिक स्थितीवर शंका घेऊन तुम्हाला नकार देऊ शकते.
-
काही कार्ड हे फक्त २१ ते ६० वयोगटातील लोकांसाठी आहेत त्यामुळे जर तुम्ही या वयोगटात बसत नसाल तर तुमचा अर्ज नाकारला जाईल.
-
जर तुमच्याकडे जुन्या कर्जाची किंवा कार्ड पेमेंटची थकबाकी असेल, तर तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड मिळवणे कठीण होईल.
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…