-
Credit Card Tricks and Tips: क्रेडिट कार्डचा योग्य आणि विचारपूर्वीक वापर करणे तुमचा खिसा आणि सिबिल स्कोअर या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रेडिट कार्ड जरी सुविधा देत असले, तरी काही चुकीच्या सवयी तुमच्या क्रेडिट स्कोअरला नुकसान पोहोचवू शकतात. तुमच्या क्रेडिट कार्डाने बचत करण्यासाठी आणि सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आपण जाणून घेणार आहोत. (फोटो – freepik)
-
क्रेडिट कार्ड वापरून एटीएममधून रोख रक्कम काढणे महागात पडते, कारण यावर लगेचच शुल्क आणि व्याज लागू होण्यास सुरुवात होते. हा पर्याय फक्त आपत्कालीन परिस्थितीत निवडा आणि काढलेली रक्कम लवकरात लवकर परत करा. (फोटो – freepik)
-
तुमच्या आर्थिक क्षमतेबाहेर खर्च करणे टाळा
तुमच्या पैसे भरण्याच्या क्षमतेच्या पुढे जाऊन खर्च करणे टाळा, यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असते. एक मासिक बजेट निश्चित करा आणि त्यानुसारच खर्च करा, जेणेकरून बिल वेळेवर आणि पूर्णपणे भरता येईल. (फोटो – freepik) -
फक्त किमान रक्कम भरल्याने मोठे व्याज भराव लागू शकते. जास्त व्याज आणि शुल्कापासून वाचण्यासाठी, तुमचे बिल पूर्ण भरा. (फोटो – freepik)
-
क्रेडिट कार्डाचे फायदे जसे की कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स यांचा नक्की उपयोग करा. तुमच्या खर्च करण्याच्या सवयींनुसार तुम्हाला फायदेशीर ठरेल असे कार्ड निवडा. (फोटो – freepik)
-
क्रेडिट लिमीटचा ३० टक्क्यांपेक्षा जास्त वापरू नका. जास्त वापर केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर प्रभावित होतो, त्यामुळे क्रेडिट लिमिटचा ३० टक्क्यांपेक्षा कमी वापर करणे उत्तम मानले जाते. (फोटो – freepik)
-
वारंवार क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू नका. कारण कमी वेळेत अनेक कार्डांसाठी अर्ज केल्याने तुमच्या स्कोअरला नुकसान पोहोचू शकते. आवश्यकतेनुसारच नवीन कार्ड घ्या आणि दोन अर्जांमध्ये सहा महिन्यांचे अंतर ठेवा. (फोटो – freepik)
-
वेळेवर बिल भरा
लेट फीस आणि व्याजापासून वाचण्यासाठी बिल वेळेवर भरणे आवश्यक आहे. पेमेंट रिमाइंडर्स सेट करा किंवा ऑटोमेटेड पेमेंटचा पर्याय निवडा. (फोटो – freepik)
एवढी रक्कम भरा, मगच व्यवहार रद्द! पार्थ पवारांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाचा दणका…