-
हिंगिससह सानियाने महिला दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरले. मिर्झा-हिंगिस जोडीने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॅसेय डेल्लाक्युआ व कझाकस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेडोव्हा या जोडीचा अवघ्या ६९ मिनिटांत ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
-
या जोडीचे हे दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
-
याच वर्षी विम्बल्डन स्पध्रेत भारत-स्वीस जोडीने बाजी मारली होती.
-
मिर्झाचे हे एकूण पाचवे ग्रँड स्लॅम जेतेपद असून हिंगिसचे २०वे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
-
मिर्झा-हिंगिसने तोडीस तोड खेळ करून पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. दुसरा सेट मग मिर्झा-हिंगीस जोडीने आरामात ६-३ अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.
-
अंतिम लढतीत १-१ अशा बरोबरीत असताना मिर्झा-हिंगिस जोडीला ब्रेक पॉइंटवर गुण मिळवण्यात अपयश आले, परंतु त्यानंतर त्यांनी ३-१ अशी आघाडी घेतली. मग ती ५-२ अशी वाढवली.

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”