-
क्रिकेट जगतातील सर्वोच्च मंडळ असलेल्या जागतिक क्रिकेट परिषदेने (ICC) 2019 या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले.
-
-
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला ICC चा विश्वातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोकृष्ट क्रिकेटपटू (Sir Garfield Sobers Trophy for the world player of the year) म्हणून गौरविण्यात आले.
-
भारतीय कर्णधार विराट कोहली याला त्याने केलेल्या एका स्तुत्य कामगिरीसाठी ICC चा खिलाडूवृत्तीचा सन्मान करणारा पुरस्कार (ICC spirit of cricket) देण्यात आला.
-
स्कॉटलंडच्या कायल कोएत्झर याला ICC च्या संलग्न संघांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार (Associate Player of the Year) करण्यात आला.
-
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबूशेन याला वर्षातील उदयोन्मुख क्रिकेटपटूचा (Men's emerging cricketer of the year) पुरस्कार मिळाला.
-
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला ICC चा सर्वोकृष्ट कसोटीपटू (Test Cricketer of the Year) निवडण्यात आले.
-
भारताच्या दीपक चहरला टी २० क्रिकेटमधील वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरीचा (T20I Performance of the Year) पुरस्कार मिळाला.
-
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रिचर्ड इलिंगवर्थ यांना ICC चे २०१९ मधील सर्वोत्तम पंच (Umpire of the year) म्हणून गौरविण्यात आले.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…