-
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. २०१९ विश्वचषक संपल्यानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेकदा त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु असते.
-
परंतू धोनीचे चाहते अजुनही तो मैदानात उतरेल आणि नेहमीप्रमाणे फलंदाजी करेल अशी आशा बाळगून आहेत. काही दिवसांपूर्वी धोनीने आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सराव करण्यास सुरुवात केली होती. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्याचं पुनरागमन लांबणीवर पडलंय.
-
आज आपण आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर असलेले ५ अनोखे विक्रम पाहणार आहोत.
-
५) आयपीएल असो किंवा भारतीय संघ, धोनी मधल्या फळीत फलंदाजीला येतो हे सर्वांना माहिती आहे. आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकावर (५ विविध स्थानांवर) खेळत असताना धोनीने पाचवेळा अर्धशतकं झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
-
४) आजही धोनीला अनेक जणं सर्वोत्तम फिनीशर म्हणून ओळखतात. आयपीएलमध्ये अखेरच्या षटकात खेळताना धोनीने आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत धोनीने अखेरच्या षटकात २४४ च्या स्ट्राइक रेटने ५५४ धावा केल्या आहेत, ज्यात ४६ षटकारांचा समावेश आहे.
-
३) आयपीएलमध्ये किमान १ हजार धावा काढल्याच्या निकषात सर्वोत्तम सरासरी असलेल्या भारतीय फलंदाजांमध्येही धोनीचा नंबर लागतो. महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतांशवेळा धोनी मधल्या फळीत खेळायला येत असल्यामुळे त्याची ही आकडेवारी दाद देण्यासारखी आहे. आयपीएलमध्ये धोनीची सरासरी आहे ४२.२०…
-
२) आयपीएलच्या अंतिम फेरीत सर्वाधिकवेळा पोहचणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. आतापर्यंत धोनीने ९ वेळा अंतिम फेरी खेळली आहे. ज्यातील ८ वेळा तो चेन्नई संघाकडून तर एकदा पुणे संघाकडून खेळला आहे. २०१०, २०११ आणि २०१८ या तीन वर्षांमध्येच धोनी आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला आहे.
-
१) धोनीने आतापर्यंत १७४ आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून काम पाहिलं आहे. ज्यातील १०४ सामने तो जिंकला आहे, त्याच्या विजयाची टक्केवारी आहे ६०.११…धोनी खालोखाल रोहित शर्मा आणि गौतम गंभीर या कर्णधारांचा नंबर लागतो.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग