-
करोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात तब्बल ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. परंतू या काळात होत असलेलं आर्थिक नुकसान लक्षात घेता आयसीसीने सामन्यांना परवानगी देत, प्रत्येक संघांसाठी नियम आखून दिले. यात प्रेक्षकांविना क्रिकेट हा महत्वाचा नियम होता. (सर्व छायाचित्र सौजन्य – ESPNCricinfo)
-
इंग्लंडमध्ये प्रेक्षकांसह क्रिकेट सामना आयोजित करण्याचा एक प्रयोग नुकताच पार पडला. सरे विरुद्ध मिडलसेक्स या प्रदर्शनीय सामन्यासाठी ओव्हल मैदानावर १००० प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती.
-
सामना पहायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सर्व नियमांचं पालन करुन प्रवेशद्वारापाशी सॅनिटायजर ठेवलेलं होतं.
-
लॉकडाउन पश्चात क्रिकेट सुरु झाल्यानंतर मैदानात प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवला गेलेला हा पहिला सामना ठरला आहे.
-
ब्रिटन सरकारने काही दिवसांपूर्वी स्थानिक सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. याची रंगीत तालिम करण्यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं, जे यशस्वी झाल्याचं दिसतंय.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”