-
बहुप्रतिक्षित IPL 2020 साठी २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी बीसीसीआयने दिली. मुंबईचा संघही नुकताच युएईला रवाना झाला. मात्र यावेळेस अनेक खेळाडू हे मास्क आणि पीपीई कीटसारखा पोषाख असल्याने ओळखूनच हेत नव्हते. त्यातच मुंबई इंडियन्सच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर २०१९ साली आणि आता खेळाडूंनी कसा आयपीएलसाठीचा प्रवास सुरु केला होता याचे फोटो पोस्ट केले आहेत. पाहुयात कशाप्रकारे या खेळाडूंनी यंदा करोनामुळे अधिक काळजी घेत प्रवास केला याची झलक (सर्व फोटो : मुंबई इंडियन्स फेसबुकबूक पेजवरुन साभार)
-
रोहित शर्मा अॅण्ड फॅमेलिने मागील वर्षी कसा प्रवास केला आणि यंदा कसा प्रवास करत आहेत पाहा. हा फोटो मुंबई एअरपोर्टवरील आहे.
-
हे मुंबई इंडियन्सचे सदस्य कोण आहेत ओळखा पाहू असा प्रश्न विचारत हा फोटो अधिकृत फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे
-
युएईमध्ये पोहचल्यानंतरचा आनंद रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.
-
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा कणा म्हणून ओळखऱ्या जाणाऱ्या बुमराहने अशाप्रकारे प्रवासाला सुरुवात करण्याआधीच व्हिक्ट्री पोज दिली.
-
बुहराहचा हा फोटो आहे युएईमध्ये लॅण्डींग केल्यानंतरचा
-
पांड्या बंधू… हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी मुंबई विमानतळावर अशी पोज देत निरोप घेतला
-
युएईमध्ये लॅण्डींगनंतरचा हा फोटो कोणाचा आहे ओळखा पाहू
-
चला आम्हीच सांगतो हा आहे हार्दिक पांड्या.
-
आदित्य तरे आपल्या कुटुंबासहीत युएईला रवाना झाला तो आताचा आणि डावीकडे मागील वर्षीचा फोटो
-
मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला तुम्ही नक्कीच ओळखलं नसेल. आम्ही सांगतो या खेळाडूचे नाव, हा आहे अनकुल रॉय.
-
धवल कुलकर्णी आणि त्याची मुलगी नेत्रा यांचा हा युएईला लॅण्ड झाल्यानंतरचा फोटो.
-
सूर्यकुमार यादव आणि त्याच्या पत्नीचा हा फोटो फोटो मुंबई इंडियन्सने देन अॅण्ड नाऊ स्टाइलच्या थीममध्ये पोस्ट केला आहे.
-
झॅक इज बॅक या तीन शब्दांवरुनच हा खेळाडू कोण आहे तुम्हाला कळलं असेल. नाही कळलं अहो हा आहे आपला जहीर खान
-
प्रवासच नाही तर त्या आधीपासून सर्व खेळाडू युएईला जाण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले तेव्हापासून अगदी शरीराचे तापमान तपासणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून सर्व खबरदारी घेतली जात होती.
-
प्रवासापूर्वीपासूनच म्हणजे सर्व खेळाडू मुंबईमध्ये दाखल झाल्यापासून करोनासंदर्भातील सर्व काळजी घेण्यात येत होती. हा पांड्या बंधूचा मुंबईमधील हॉटेलमध्ये चेक इन करतानाचा फोटो

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…