-
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ युएईत दाखल झाले आहेत. यंदा भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता युएईत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. करोनाविषयीचे सर्व नियम पाळण्यासाठी सर्व संघांनी आपल्या खेळाडूंना राहण्यासाठी खास पंचतारांकित हॉटेल्सची सोय केली आहे.
-
चेन्नई सुपरकिंग्जचा संघही युएईत दाखल झाला आहे. इतर संघांनी उपलब्धतेप्रमाणे हॉटेल बूक केली आहेत. पण चेन्नई सुपरकिंग्जने युएईत पोहचल्यानंतरही भारतीय ब्रँडला पसंती दिली आहे.
-
दुबईतील ताज हॉटेलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा संघ राहणार आहे. आज आपण या पंचतारांकित हॉटेलची सफर करणार आहोत. (छायाचित्र सौजन्य – Taj Dubai official Website)
-
जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळख असलेल्या बुर्ज खलिफा या इमारतीशेजारीच ताजचं हे पंचतारांकित हॉटेल आहे.
-
दुबईत महत्वाच्या ठिकाणी असलेल्या ताज हॉटेलमध्ये एकून २९६ अलिशान खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत प्राचीन भारतीय आणि स्थानिक संस्कृतीचा मिलाप करुन खास डिजाईन तयार करण्यात आली आहेत.
-
बुर्ज खलिफा व्ह्यू, प्रेसिंडेंशिअल सूट, महाराजा सूट असे विविध प्रकार या हॉटेलमध्ये आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन हा दुबईत दाखल झाला होता. शेनला या हॉटेलमध्ये बुर्ज खलिफाचा व्ह्यू असलेली रुम मिळाली आहे.
-
सध्या चेन्नईचे सर्व खेळाडू करोनाच्या नियमांचं पालन करन हॉटेलमध्ये क्वारंटाइन झाले आहेत.
-
खेळाडूंना सर्व आत्याधुनिस सोयी-सुविधा या हॉटेलमध्ये मिळणार आहेत.
-
प्रत्येक खेळाडूला वेगळी रुम आणि त्यात अशी खास सोय असणार आहे.
-
आयपीएल स्पर्धा म्हटली की फिटनेस कायम राखणं आलंच…यासाठी खास जिम आणि फिटनेस सेंटरचीही सोय करण्यात आली आहे.
-
याव्यतिरीक्त खेळाडूंसाठी स्विमींग पूलही असणार आहे.
-
आयपीएलच्या काळात CSK प्रशासनाने या हॉटेलमधील काही रुम्स या फक्त आपल्या खेळाडूंसाठी राखीव करुन घेतल्या आहेत.
-
प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक संघ आणि खेळाडूंना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
-
संध्याकाळी ताज हॉटेलमधून दिसणारं नयनरम्य दृष्य
-
प्राचीन भारतीय संस्कृतीचा वापर करुन या हॉटेलमधील प्रत्येक गोष्टी सजवण्यात आल्या आहेत.
-
हॉटेलच्या प्रत्येक कोपऱ्यात भारतीय संस्कृतीसोबतच स्थानिक संस्कृतीचा मिलापही आपल्याला पहायला मिळतो.
-
खेळाडूंना सोशल डिस्टन्सिंग पाळता यावं याची पुरेपूर काळजी घेतलती जाणार आहे.
-
ताज हॉटेलच्या लॉबीमधलं एक सुंदर दृष्य
-
रात्रीच्या वेळी हॉटेलमधून बुर्ज खलिफाचा नजारा पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
-
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा युएईत रंगेल.
-
तोपर्यंत चेन्नईच्या खेळाडूंचा मुक्काम याच हॉटेलमध्ये असणार आहे.

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”