-
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरूवात झाली आहे. जगभरातील सर्व खेळाडूंचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचं आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आलं आहे.
-
आयपीएल म्हटलं की खेळाडू आणि त्यांचं मानधन हा चर्चेचा विषय आलाच. परंतु आयपीएलमध्ये खेळणाऱ्या काही परदेशी खेळाडूंचं मानधन सर्वात कमी आहे. जाणून घेऊया याबाबत.
-
जॉशूआ फिलिप हा खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडून फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. त्याला केवळ २० लाख रूपये इतकं मानधन मिळालं आहे.
मिचेल मॅक्लेनेघन हा मुंबई इंडियन्सकडून सर्वात कमी मानधन मिळालेला खेळाडू आहे. न्यूझीलंडच्या या खेळाडूला १ कोटी रूपये इतकं मानधन देण्यात आलं आहे. किमो पॉल हा वेस्ट इंडिजचा खेळाडून असून तो सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत आहे. या संघात सर्वात कमी म्हणजेच ५० लाखांचं मानधन त्याला देण्यात आलं आहे. -
न्यूझीलंडचा जेम्स निशम हा किंग्स इलेव्हन पंजाबकडून सर्वात कमी मानधन मिळणारा परदेशी खेळाडू आहे. त्याला संघाकडून ५० लाखांचं मानधन देण्यात आलं आहे.
-
कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वात कमी मानधन मिळणारा परदेशी खेळाडू म्हणजे ख्रिस ग्रीन. ख्रिस ग्रीन हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू असून त्याला २० लाख रूपये मानधन देण्यात आलं आहे.
-
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेव्हिड मिलर हा राजस्थान रॉयल्सकडून सर्वात कमी मानधन मिळालेला परदेशी खेळाडू ठरला आहे. त्याला ७५ लाख रूपये इतकं मानधन देण्यात येत आहे.
-
जमैकाच्या फॅबियन अॅलन याला सनरायझर्स हैदराबादकडून ५० लाख रूपयांचं मानधन देण्यात येत आहे.
-
मिशेल सँटनर हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. त्याला ५० लाख रूपये इतकं मानधन देण्यात आलं आहे.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’