-
दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात RCB ने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सुपरओव्हरमध्ये पराभवाचा धक्का दिला. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)
-
विजयासाठी आवश्यक असलेल्या ८ धावा एबी डिव्हीलियर्स आणि विराट कोहली जोडीने पूर्ण केल्या.
-
मुंबई इंडियन्सने निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत सोडवल्यामुळे सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागला.
-
सोशल मीडियावर सध्या इशान किशन, पोलार्ड, डिव्हीलियर्स यांची चर्चा सुरु असली तरीही RCB च्या नवदीप सैनीने पोलार्ड आणि पांड्या यांसारख्या कसलेल्या फलंदाजांसमोर टिच्चून मारा करत सुपरओव्हरमध्ये फक्त ७ धावा दिल्या. पाहूया कसं गेलं सैनीचं सुपरओव्हरमधलं षटक….
-
पहिला चेंडू – पोलार्डला यॉर्कर, एक धाव (मुंबई १/०)
-
दुसरा चेंडू – फुलटॉस चेंडू, परंतू संधीचा लाभ घेण्यास पांड्या अपयशी (मुंबई २/०)
-
तिसरा चेंडू – पोलार्डचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण एकही धाव नाही
-
चौथा चेंडू – फुलटॉस चेंडू, पोलार्डचा चौकार (मुंबई ६/०)
-
पाचवा चेंडू – पोलार्ड बाद, (मुंबई ६/१)
-
सहावा चेंडू – पांड्याकडून चेंडू हुकला, परंतू एक धाव काढत RCB ला विजयासाठी ८ धावांचं आव्हान

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा