-
IPL 2020 स्पर्धेत प्रत्येक संघाचे ७ किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळून झाले आहेत. या सामन्यांनंतर अजूनही सर्व ८ संघांमध्ये 'प्ले-ऑफ्स'साठी चुरस पाहायला मिळते आहे. (सर्व फोटो- IPL.com, सोशल मीडिया)
-
कोलकाता संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी करत ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्यांचा संघ ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
-
संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक मात्र अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. एक-दोन सामने वगळता त्याला फारशा धावा जमवता आलेल्या नाहीत.
-
याचदरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाने हंगामाच्या मध्यातच कर्णधार बदलल्यामुळे चर्चा रंगली आहे.
-
दिनेश कार्तिक कर्णधारपदावरून पायउतार झाला असून वन डे विश्वविषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन मुंबईविरूद्धच्या सामन्यापासून संघाचं नेतृत्व करणार आहे.
-
हंगामाच्या मध्यातच कर्णधार बदलण्याची एखाद्या संघाची पहिलीच वेळ नाही. या आधीही काही संघांनी आपले कर्णधार विशिष्ट कारणासाठी स्पर्धेच्या मध्येच बदलले आहेत. पाहा कोणकोणत्या दिग्गजांना कर्णधारपद सोडावं लागलं होतं….
-
१. २००८: व्ही व्ही एस लक्ष्मण –> अॅडम गिलक्रिस्ट (संघ – डेक्कन चार्जर्स | कारण – खराब कामगिरीमुळे स्वत:ला केलं संघातून बाहेर)
-
२. २००८: हरभजन सिंग –> शॉन पोलॅक (संघ – मुंबई इंडियन्स | कारण – श्रीसंतला चपराक लगावल्यामुळे निलंबन)
-
३. २००९: केविन पीटरसन –> अनिल कुंबळे (संघ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | कारण – आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे स्पर्धेतून माघार)
-
४. २०१२: डॅनियल व्हेटोरी –> विराट कोहली (संघ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | कारण – खराब कामगिरीमुळे संघातून वगळलं)
-
५. २०१२: कुमार संगाकारा –> कॅमेरॉन व्हाईट (संघ – डेक्कन चार्जर्स | कारण – खराब कामगिरीमुळे स्वत:ला केलं संघाबाहेर)
-
६. २०१३: रिकी पॉन्टींग –> रोहित शर्मा (संघ – मुंबई इंडियन्स | कारण – संघाच्या खराब कामगिरीमुळे पदत्याग)
-
७. २०१४: शिखर धवन –> डॅरन सॅमी (संघ – सनरायझर्स हैदराबाद | कारण – खराब कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने केलं कर्णधारपदावरून दूर)
-
८. २०१५: शेन वॉटसन –> स्टीव्ह स्मिथ (संघ – राजस्थान रॉयल्स | कारण – खराब कामगिरीमुळे अचानक नाणेफेकीला वॉटसनऐवजी स्मिथ मैदानावर, स्मिथने नाणेफेकीच्या वेळी सांगितला बदल)
-
९. २०१६: डेव्हिड मिलर –> मुरली विजय (संघ – किंग्ज इलेव्हन पंजाब | कारण – कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे संघ व्यवस्थापनाचा कठोर निर्णय)
-
१०. २०१८: गौतम गंभीर –> श्रेयस अय्यर (संघ – दिल्ली कॅपिटल्स | कारण – खराब कामगिरीमुळे स्वत:ला केलं संघाबाहेर)

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या