-
खाकी वर्दीत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याला ओळखलंत का?? उंचपुरा, मजबूत देहयष्टी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी किताब विजेता विजय चौधरी सध्या पुण्यात वाहतूक विभागात कार्यरत आहे. (सर्व फोटो – पवन खेंगरे)
-
२०१४ ते २०१६ या कालावधीत विजयने सलग ३ वर्ष मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.
-
विजयच्या कामगिरीवर खुश होऊन तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने त्याला राज्य पोलीस दलात पोलीस उप-अधिक्षक पदावर नोकरी दिली. २०१७ साली विजय महाराष्ट्र पोलिसांमध्ये रुजू झाला.
-
विजय आपलं पोलिसांचं कर्तव्य बजावत असला तरीही कुस्ती हे आपलं पहिलं प्रेम तो विसरलेला नाही.
-
लॉकडाउन पश्चात सर्व गोष्टी आता हळुहळु रुळावर येत असताना विजयने स्वतःसमोर एक ध्येय ठेवलं आहे.
-
महाराष्ट्राच्या लाल मातीतला हा वाघ आता सज्ज झाला आहे हिंद केसरीचा किताब पटकावण्यासाठी…
-
तालमीत उतरलं की रिवाजाप्रमाणे पहिले अंगाला माती लागलीच पाहिजे…
-
या मातीशिवाय पैलवानांच्या अंगात स्फुरण येतंच नाही असं म्हणतात…
-
विजयला कुस्तीसाठी तयार होत असताना पाहणं हा देखील इतर मल्लांसाठी एक वेगळा अनुभव असतो.
-
मग सुरु होतो खरा सराव…
-
फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ दरम्यान हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन होणार आहे.
-
त्यामुळे सकाळी सर्वात आधी तालमीत जाऊन सराव केल्यानंतर मग आपली ड्युटी असं दुहेरी कर्तव्य विजय सध्या बजावत आहे.
-
एक दोन डाव रंगले…शरीर गरम झालं की मग समोरच्या मल्लाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केला जातो.
-
लॉकडाउन काळात तालीम बंद असताना स्वतःचा फिटनेस कायम राखणं आणि त्यानंतर पुन्हा सरावाला सुरुवात करणं हे मल्लांसाठीही एक आव्हान असतं.
-
या सरावादरम्यान अनेकदा दुखापतही होते…पण त्याकडे लक्ष न देता सराव सुरु ठेवावा लागतो.
-
विजय चौधरीसारख्या नावाजलेल्या मल्लासोबत कुस्ती खेळायला मिळणं हा इतर मल्लांसाठीही एक आनंदाचा क्षण असतो.
-
सरावादरम्यान विजयही आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत असतो.
-
सरावादरम्यानचा एक क्षण…
-
दम लागला…की थोडावेळ आराम करायचा परत माती अंगायला लावायची आणि पुन्हा तालमीत उतरायचं हा प्रत्येक मल्लाचा जीवनक्रम बनला आहे.
-
काहीही झालं तरी हिंद केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरायचं हे विजयने यंदा पक्क केलं आहे.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL