पद्मश्री पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि संगीता फोगट विवाहबंधनात अडकले आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा दिमाखात पार पडला. संगिता फोगट 'दंगल गर्ल' गीता आणि बबीता फोगट यांची छोटी बहीण आहे. या लग्नाची खास बात म्हणजे… बजरंग पुनिया आणि संगीता फोगट दाम्पत्यांनी सात ऐवजी आठ फेरे घेत लग्न केलं आहे. ८ वा फेरा "मुली वाचवा मुली शिकवा' या संकल्पासह त्यांनी पूर्ण केला. याआधी गीता आणि बबीता यांनी देखील त्यांच्या लग्नात ८ फेरे घेतले होते. चरखी ददरी जिल्ह्यातील बलाली गावात हा सोहळा पार पडला. कोरोना व्हायरचा धोका लक्षात घेत लग्नासाठी मर्यादीत पाहुणे उपस्थित होते. बजरंग पुनिया आणि संगीता फोगट यांच्या लग्नसंमारंभाचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. संगीताच्या बहिणी गीता आणि बबीता यांनी देखील या लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. बजरंग आणि संगीता यांचं लग्न मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ठरलं होतं. त्यावेळी त्यांचा साखरपुडाही झाला होता. बजरंग पुनिया आणि संगीता फोगट यांनी टोकियो ऑलिंपिक २०२०नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र करोना विषाणूमुळे ही स्पर्धा वर्षभर पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे दोघांनी यंदा लग्न करायचा निर्णय घेतला. बजरंग भारताकडून ६५ किलो वजनी गटात खेळतो. तो टोकियो ऑलिंपिकसाठी देखील पात्र ठरला आहे. तो लग्नानंतर काही दिवसांनी ट्रेनिंगसाठी युएसएला जाणार आहे.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल