आयपीएलमध्ये एकत्र खेळणारे भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आता एकमेंकाविरोधात खेळत आहेत. युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामत ऑस्ट्रेलियाच्या काही फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही, त्यामुळे काही आयपीएल संघाना फटका बसला. आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप ठरणाऱ्या या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे… पाहूयात कोण-कोणते खेळाडू आहेत… यामध्ये सर्वात पहिलं नाव ग्लेन मॅक्सवेल याचं आहे. मॅक्सवेलनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात १९ चेंडूत ४५ धावांची खेळी केली आहे. या खेळीदरम्यान मॅक्सवेलनं पाच षटकार आणि पाच चौकार लगावले आहेत. आयपीएलच्या १३ व्या हंगामात १३ सामन्यात फक्त १०८ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे मॅक्सवेलला आयपीएलमध्ये एकही षटकार लगावता आला नाही. मात्र, पहिल्याच एकदिवसीय सामन्यात मॅक्सवेलनं पाच षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ११४ धावांची खेळी केली. फिंचच्या दमदार फलंदाजाच्या बळावर ऑस्ट्रेलिया ३७४ धावांपर्यंत पोहचला. आयपीएलमध्ये फिंचला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फिंचच्या खराब कामगिरीचा फटका आरसीबीला बसला. फिंचनं १२ सामन्यात २६८ धावा केल्या आहेत. स्मिथनंही पहिल्या एकदिवसीय सामन्यात तुफानी शतक झळकावलं आहे. स्मिथनं फक्त ६२ चेंडूत शतक झळकावलं. स्मिथ-फिंच यांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रलियाचा संघ ५० षटकांत ३७४ धावांपर्यंत पोहचला. आयपीएलमध्ये राजस्थान संघाचा कर्णधार असणारा स्मिथला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली नाही. स्मिथला १४ सामन्यात ३११ धावा केल्या आहेत.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…