भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरैश रैनाचा नुकताच ३४ वाढदिवस झाला. रैनानं आपल्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये वाढदिवस साजरा केला. सुरेश रैनाने वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पत्नी आणि मुलांसोबत मालदीवमध्ये वाढदिवस एन्जॉय करत असलेले फोटो रैनानं पोस्ट केले आहेत. सुरेश रैना आणि पत्नी प्रियंकाला दोन मुलं आहेत. मुलगी ग्रेसिया चार वर्षाची आहे. तर आठ महिन्याच्या मुलाचं नाव रिओ आहे. सुरेश रैना आणि पत्नी प्रियंका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. दोघेही एकमेंकाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट कर प्रेम व्यक्त करत असतात. आयपीएलपूर्वीच सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामातून सुरैश रैनानं माघार घेतली होती. आयपीएलमध्ये रैनानं १९३ सामन्यात ५,३२८ धावा चोपल्या आहेत. यामध्ये ३८ अर्धशतकाचा समावेश आहे. सुरेश रैना एनजीओच्या मदतीनं सध्या सामाजिक कार्य करत आहे. ३४ व्य वाढदिवसानिमित्त सुरेश रैनानं ३४ शाळांचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. शाळेतील पाणी, स्वच्छता आणि शौचालय यासारख्या समस्या दूर करण्यासाठी रैनाची एनजीओ काम करणार आहे.

Daily Horoscope: बुधवारी १२ पैकी ‘या’ राशींना अचानक लाभासह मिळेल मानसिक शांतता; तुमच्या पदरात कसं पडेल सुख? वाचा तुमचे राशिभविष्य