-
तिसऱ्या एकदिवस सामन्यात तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नजराजन यानं भारतीय संघात पदार्पण केलं आहे. कर्णधार विराट कोहलीनं सामना सुरु होण्यापूर्वी पदार्पणाची कॅप देत नटराजनचं भारतीय संघात स्वागत केलं आहे. (फोटो सौजन्य – टी नटराजन इन्स्टाग्राम)
-
आयपीएलच्या १३ व्या सीजनमध्ये आपल्या परफेक्ट यॉर्करने नटराजने अनेक दिग्गज फलंदाजांना धक्का दिला.
-
राष्ट्रीय निवड समितीने गोलंदाजीतील त्याची हीच गुणवत्ता हेरुन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी-२० संघात त्याला स्थान दिले.
-
पहिल्या दोन वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पार निराशा केली. त्यामुळे टी. नटराजनकडून आजच्या सामन्यात भरपूर अपेक्षा आहेत.
-
टी-२० सामन्यात फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले. त्याच्याजागी नटराजनला संधी मिळाली आहे.
-
नटराजन आज भारतीय संघातून खेळत असला तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे जीवन संघर्ष आणि कष्टाने भरलेले आहे.
-
नटराजनला त्याच्या आईने खूप कष्टाने मोठे केले आहे. एक काळ असा होता की, नटराजनची आई रस्त्याच्याकडेला स्टॉल लावायची. त्याचे वडिल रेल्वेमध्ये पोर्टर म्हणून काम करायचे.
-
नटराजनकडे क्रिकेट किट खरेदी करण्याचेही पैसे नव्हते. २९ वर्षाच्या नटराजनच्या कुटुंबाची खूप बेताची परिस्थिती होती. या सर्व कठिण परिस्थितीवर मात करुन तो आज भारतीय संघापर्यंत पोहोचला आहे.
-
आयपीएलच्या १६ सामन्यात नटराजन यानं १६ बळी घेतलं आहेत. या हंगामात सर्वाधिक यॉर्कर नटराजनच्या नावावर आहेत. नटराजन यानं आयपीएलच्या १३ व्या हंगामात जवळापास ७० यॉर्कर टाकले होते.
-
स्थानिक क्रिकेटमध्ये नटराजन यानं आपल्या कामगिरीनं प्रभावित केलं आहे. २० प्रथम श्रेणी सामन्यात ६४ विकेट घेतल्या आहेत.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम