भारतीय कर्णधार विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यात १२ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान १२ हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर आहे. याआधी हा विक्रम सचिनच्या नाववार होता. विराट कोहलीसह एकदिवसीय सामन्यात सहा जणांनी १२ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. पाहूयात कोणते आहेत खेळाडू…. विराट कोहलीनं २५१ सामन्यात १२ हजार धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकरनं ३०९ सामन्यात हा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगला १२ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी ३२३ सामने खेळावे लागले. कुमार संगाकाराने ३५९ सामन्यात हा पराक्रम केला आहे. सनथ जयसूर्यानं ३९० सामन्यात १२ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. -
४२६ सामन्यात जयवर्धनेनं १२ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम