भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी २०११ ते २०२० मधील आपला टी-२० संघ निवडला आहे. सोशल मीडियावर त्यांनी दशकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड केली आहे. आकाश चोप्राच्या संघामध्ये जगभरातील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा समावेश आहे. आकाश चोप्रानं आपल्या संघामध्ये धोनी, युवराज, हार्दिक, जाडेजा, डिव्हिलिअर्स, वॉर्नर, राबाडा आणि विल्यमसन यासारख्या दिग्गजांना संधात स्थान दिलेलं नाही. आकाश चोप्रानं आपल्या संघात भारत-ऑस्ट्रेलिया संघातील प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंचा समावेश केला. तर श्रीलंका, अफगानिस्तान, इंग्लंड, वेस्टइंडीज आणि बांगलादेश संघातील प्रत्येकी एका खेळाडूंचा समावेश केला आहे. धोनीला संघात स्थान न दिल्यामुळे सोशल मीडियावर आकाश चोप्रा यांच्यावर टीका होत आहे. पाहूयात आकाश चोप्रा यांनी दशकातील टी-२० संघात कोणाला निवडलं आहे.. रोहित शर्मा अॅरोन फिंच विराट कोहली शाकिब अल हसन जोस बटलर (यष्टीरक्षक) ग्लेन मॅक्सवेल कायरन पोलार्ड राशिद खान मिचेल स्टार्क जसप्रीत बुमराह लसिथ मलिंगा (कर्णधार)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…