-
भारत आणि इंग्लंडदरम्यान होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये पहिल्यांदाच एक नवीन नाव दिसत असून या नावाची सध्या सोशल मीडियावरही तुफान चर्चा आहे. हे नाव आहे प्रसिद्ध कृष्णा…
-
तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात असून यंदा दोन नवीन चेहऱ्यांना सधी देण्यात आलीय. सूर्यकुमार यादवला या संघामध्ये जागा मिळेल असं यापूर्वीच सांगितलं जातं होतं. मात्र या यादीमध्ये एक नवीन नाव आहे जे वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. विराटच्या या संघामध्ये प्रसिद्ध कृष्णाला स्थान देण्यात आलं आहे.
-
प्रसिद्ध कृष्णा हा मूळचा कर्नाटकचा असून जलग गोलंदाज म्हणून त्याला संघात संधी देण्यात आली आहे. मात्र कुठेही फारशी चर्चा नसणाऱ्या प्रसिद्धला पृथ्वी शॉ आणि इतर नावाजलेल्या खेळाडूंना डावलून कशी संधी मिळाली यासंदर्भात चर्चा सुरु झाल्यात.
-
इंग्लंडसारख्या अव्वल दर्जाच्या संघाविरोधात आगामी मालिकेमध्ये संधी मिळालेल्या प्रसिद्ध कृष्णाबद्दलच्या काही गोष्टी आणि त्याच्याबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
खरं सांगायचं झालं तर प्रसिद्ध कृष्णा अ दर्जाचे ५० सामनेही खेळलेला नाही. मात्र विजय हजारे चषकामध्ये त्याने केलेल्या कामगिरीमुळे तो चर्चेत आला आणि थेट आता भारतीय संघाच्या ब्लू जर्सीमध्ये तो दिसणार आहे.
-
उजव्या हाताने गोलंदाजी करणारा प्रसिद्ध कृष्णा हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये कोलकाताना नाईट रायडर्सकडून खेळतो.
-
प्रसिद्धने आत्तापर्यंत ४८ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५.१७ सरासरीने ८१ बळी घेतले आहेत.
-
त्याचप्रमाणे प्रसिद्धने ९ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ३४ बळी घेतले आहेत.
-
प्रसिद्ध आतापर्यंत ४० टी २० सामने खेळला असून त्याने ३३ बळी घेतले आहेत.
-
प्रसिध कृष्णा
-
या २५ वर्षीय खेळाडूची सर्वात आधी चर्चा २०१५ साली झाली होती. तेव्हा बांग्लादेश अ संघ भारत दौऱ्यावर आला होता आणि या मालिकेमध्ये प्रसिद्ध कृष्णाने आपल्या कामगिरीची छाप सोडली होती.
-
कर्नाटकच्या संघातून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करताना प्रसिद्ध कृष्णाने बांग्लादेश अ संघाविरोधातील सामन्यात ४९ धावांमध्ये पाच बळी घेतले होते.
-
प्रसिद्ध कृष्णाने या पहिल्याच सामन्यात रॉनी तालुकदार, अनामुल हक, सौम्य सरकार और नासिर हुसैन या चार महत्वाच्या फलंदाजाच एकाच स्पेलमध्ये बाद केलं. कर्नाटकने हा सामना चार गडी राखून जिंकला होता.
-
विजय हजारे चषकामध्ये प्रसिद्ध कृष्णा पहिल्यांदा २०१६-१७ च्या हंगामत खेळला. २५ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रसिद्ध कृष्णा विजय हजारे चषकामधील त्याचा पहिला सामना खेळला.
-
त्यानंतर त्याने २०१७-१८ च्या हंगामामध्ये सैय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतून टी-२० क्रिकेटमध्ये २१ फेब्रुवारी २०१८ ला पदार्पण केलं.
-
२०१८-१९ मध्ये प्रसिद्ध कृष्णा विजय हजारे चषकामध्ये कर्नाटककडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. या हंगामात त्याने अवघ्या सात सामन्यांमध्ये १३ बळी घेतले.
-
२०१८ साली ऑगस्ट महिन्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाला भारत अ संघात संधी देण्यात आली. त्यानंतर याच वर्षी त्याला एसीसी इमर्जिंग टीम एशिया कपच्या भारतीय संघात स्थान मिळालं.
-
प्रसिद्ध कृष्णा आतापर्यंत आयपीएलचे २४ सामने खेळला असून त्यात त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत.
-
प्रसिद्ध कृष्णाची उंची सहा फूट २ इंच असल्याने तो उसळी घेणारे चेंडू अगदी उत्तम पद्धतीने टाकू शकतो.
-
२०१८ साली खेळलेल्या सात सामन्यातील १० विकेट्स, २०१९ च्या हंगामामध्ये ११ सामन्यात चार विकेट्स, २०२० साली खेळलेल्या हंगामामध्ये सहा सामन्यात चार विकेट्स प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या आहेत.
-
भारतीय संघाने इंदूरमध्ये एक टी २० सामना खेळला होता. या सामन्यानंतर विराटने प्रसिद्ध कृष्णाचं खूप कौतुक केलं होतं. "कोणते गोलंदाज त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये उत्तम आहेत हे पाहून त्या हिशोबानेच संघामध्ये गोलंदाजांची निवड केली गेली पाहिजे. मला वाटतं ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंमध्ये एक सप्राइज पॅकेज असू शकतं. असा एखादा गोलंदाज ज्याच्याकडे वेग आणि चेंडूला चांगली उसळी देण्याचं सामर्थ्य आहे. प्रसिद्ध कृष्णाने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तरी अशी गोलंदाजी फायद्याची ठरते. विश्वचषकाचा विचार केल्यास आमच्याकडे चांगला पर्याय उपलब्ध आहे," असं विराट म्हणाला होता.
-
विराट हा वेगवान गोलंदाजांची पाठराखण करणारा कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच त्याने थेट प्रसिद्ध कृष्णाचं नाव घेतलं होतं.
-
विराटने प्रसिद्धच्या बाजूने कौल देण्याचे संकेत दिले असले तरी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी २०२१ च्या आयपीएल मालिकेनंतरच टी २० संघासाठी खेळाडूंची निवड केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
-
पुढील टी २० विश्वचषक भारतामध्ये होत आहे. त्यामुळेच स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध कृष्णाकडे इंग्लंडविरुद्धची मालिका ही चांगली संधी आहे.
-
प्रसिद्ध कृष्णाने या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कामगिरीच्या जोरावर आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवल्यास त्याला पुढील मालिकांसाठी संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम