कसोटी सलामीवीर म्हणून विस्डेनने महान खेळाडू सुनील गावसकर यांना पसंती दिली आहे. गावसकरांसोबत दुसरा सलामीवीर म्हणून विस्डेनने राहुल द्रविडला संघात निवडले आहे. भारताचा नवीन वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराचाही या संघात समावेश आहे. संघातील चौथ्या क्रमांकासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विस्डेनने संघात घेतले आहे. विस्डेनने या संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीला प्राधान्य दिले आहे. यष्टीरक्षक म्हणून विस्डेनने महेंद्रसिंह धोनीला न निवडता ऋषभ पंतला स्थान दिले आहे. -
माजी कर्णधार कपिल देव यांना सातव्या क्रमांकासाठी जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये निवडले गेले आहे.
विस्डेनने या संघात तीन फिरकीपटू निवडले असून पहिली पसंती रवीचंद्रन अश्विनला दिली आहे. सध्याचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजालाही या संघात स्थान देण्यात आले आहे. भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू अशी ओळख असलेल्या अनिल कुंबळेचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. सध्या जगातील सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांमध्ये नाव कमावलेला जसप्रीत बुमराह या संघात वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल