विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) स्टार फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलचे एक मोठे विधान समोर आले आहे. चहलला महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची इच्छा आहे. क्रिकट्रॅकरच्या वृत्तानुसार चहलने ही प्रतिक्रिया दिली आहे. २०१४पासून चहल आरसीबीच्या संघातील महत्त्वाचा सदस्य आहे. यंदाचा आयपीएल हंगाम चहलसाठी चांगला गेलेला नाही. त्याने आतापर्यंत ७ सामन्यांत ४ विकेट्स घेतल्या आहेत. करोनामुळे आयपीएल २०२१ पुढे ढकलण्यात आले. आता आयपीएल २०२१ या हंगामातील उर्वरित ३१ सामने आता यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. अशा परिस्थितीत चहलला उर्वरित सामन्यांसाठी स्वत: ला तयार करण्यासाठी बराच वेळ आहे. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून चहलला ही लीग महत्त्वाची आहे. -
आयपीएल कारकिर्दीत चहलने १०६ सामन्यांत ७.७०च्या सरासरीने १२५ बळी घेतले आहेत.

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”