भारतामध्ये क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. टीम इंडियाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना अक्षरश: पुजले जाते. प्रसिद्धी, पैसा अशा अनेक गोष्टींमुळे हे क्रिकेटपटू अनेकांचे प्रेरणास्थान बनतात. मुंबईकर रोहित शर्मा हे यातीलच एक उदाहरण आहे. स्फोटक फलंदाज, उत्तम सलामीवीर, आयपीएलचा यशस्वी कर्णधार अशा अनेक उपमा रोहितला दिली जातात. मात्र, रोहित या खेळातून किती पैसे कमावतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? -
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत १०६ देशांमध्ये भारत ७२ व्या स्थानावर आहे. अहवालानुसार, भारतातील सरासरी मासिक उत्पन्न ३२,८०० रुपये आहे. एकूणच भारतीयांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३,९४,०० रुपये आहे. फोर्ब्सच्या वृत्तानुसार, रोहित शर्माचे वार्षिक उत्पन्न ५४.२९ कोटी रुपये आहे. बीसीसीआय दरवर्षी रोहित शर्माला ७ कोटी रुपये मानधन देते. बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील ग्रेड ए+ गटामध्ये रोहितचा समावेश आहे. याशिवाय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माला वर्षाकाठी १५ कोटींचे मानधन मिळते. याशिवाय तो अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे, ज्यातून तो कोट्यावधी रुपये कमावतो. -
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया सध्या तीन महिन्यांहून अधिक काळ इंग्लंड दौर्यावर आहे. टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिकेत खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्माचा देखील सहभाग आहे.

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”