वेस्ट इंडीजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी एका सामन्यादरम्यान गंभीर दुखापतीमुळे त्याला रुग्णालयात जावे लागले. ज्यामुळे तो खूप चर्चेत होता, तर दुसरीकडे त्याची पत्नी जसीम लोरादेखील एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. जसीम लोरा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा नवा फोटो. या फोटोमध्ये ती बर्फात सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. लोराने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. पीएसएलमध्ये क्वेटा ग्लेडिएटर्स संघाकडून खेळताना रसेलच्या डोक्यावर चेंडू आदळल्याने गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे रसेल रुग्णालयात असताना त्याची पत्नी सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहून लोकांनी तिला ट्रोल केले. रसेलची पत्नी लोरा एक सुपर मॉ़डेल आहे. वयाच्या १९व्या वर्षी लोराने मॉडेलिंगला सुरुवात केली. -
रसेलला भेटण्यापूर्वीच तिने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली होती. अमेरिकेत जन्मलेल्या लोराचे स्वप्न नेहमी व्हिक्टोरियाची मॉडेल बनण्याचे होते.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…