सौंदर्यातील सर्वात मोठ्या अभिनेत्रीला टक्कर देणारी भारतीय महिला क्रिकेटपटू हार्लीन देओल आज आपला २३वा वाढदिवस साजरा करीत आहे. चंदीगडमध्ये २१ जून १९९८ रोजी जन्मलेल्या हार्लीनने २०१९मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हार्लीनने आतापर्यंत भारताकडून एक एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात तिला फक्त २ धावा करता आल्या, तर टी-२०मध्ये तिच्या खात्यात ११० धावा आणि ६ बळी आहेत. भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मंधानाप्रमाणेच हार्लीन आपल्या सौंदर्यामुळे चांगली चर्चेत असते. हार्लीनने वयाच्या ८व्या वर्षी त्यांनी आपल्या भावासह आणि शेजारच्या मुलांसह क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ९व्या वर्षी ती शाळेकडून राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळू लागली. वयाच्या १३व्या वर्षी ती क्रिकेटसाठी हिमाचलला गेली आणि तेथून तिने व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हार्लीनही अभ्यासात अव्वल आहे. दहावी आणि बारावीत तिने ८० टक्के गुण मिळवले होते. ती एक अभिनेत्रीही आहे. हार्लीनचा मोठा भाऊ दंतचिकित्सक आहे. जेव्हा ती रस्त्यावर क्रिकेट खेळायची, तेव्हा शेजारचे तिच्या आईला सांगत असत, की मुलगी मोठी होत आहे आणि मोठ्या मुलांबरोबर खेळत आहे. परंतु या सर्व गोष्टींचा हार्लीनला काही फरक पडला नाही आणि तिच्या कुटूंबीयांनीही या गोष्टी ऐकल्या नाहीत.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…