टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. विराट आणि अनुष्का अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मागील काही दिवसांपासून तुमच्या लक्षात आले असेल, की अनुष्का बर्याचदा खास नेकलेस घालताना दिसत आहे. व्होग इंडिया मासिकाच्या शूटवरही तिने हा नेकलेस घातले होते. यावरून हा नेकलेस किती विशेष आहे याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. एका खास मित्राने अनुष्काला हा नेकलेस भेट दिला आहे. २०२०च्या डिसेंबरमध्ये व्होग मॅगझिनसाठी अनुष्काने फोटोशूट केले होते. यातही तिने हा नेकलेस घातला होता. काही दिवसांपूर्वी विराट-अनुष्का एका रेस्टॉरंटमध्ये बिस्किटे खात असतानाचा फोटो समोर आला होता, यातही अनुष्काच्या गळ्यात हा नेकलेस दिसत आहे. प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यसांची हिने हा नेकलेस अनुष्काच्या गरोदरपणात दिला आहे.

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर