टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने लग्नगाठ बांधली आहे. शिवमने गुरुवारी आपली प्रेयसी अंजुम खानशी लग्न केले. त्याने सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो पोस्ट केले. आपल्या लग्नाचे फोटो शेअर करताना शिवमने लिहिले- 'आम्ही प्रेम केले, जे प्रेमापेक्षा जास्त होते. आणि येथूनच आमची सुरुवात झाली.'' -
शिवमची पत्नी अंजुम खान
शिवम आणि अंजुमने मुस्लीम प्रथा पार पाडत विवाह केला. सहकारी क्रिकेटपटू श्रेयस अय्यरने शिवमला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. दुबे आणि अय्यर दोघेही मुंबई संघाकडून खेळतात. -
शिवम दुबे सध्या टीम इंडियामधून बाहेर पडला आहेत. त्याने भारताकडून एक एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत. वनडेमध्ये ९ आणि टी-२० मध्ये १३.५० अशी शिवमची सरासरी आहे. टी-२० मध्ये तो ५ विकेट घेण्यास यशस्वी झाला आहे. खराब कामगिरीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम