-
भारतीय क्रिकेटर राहुल चहर ९ मार्च रोजी विवाहबंधनात अडकला.
-
गर्लफ्रेंड ईशानीसोबत राहुलने गोव्यात लग्नगाठ बांधली.
-
नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत गोव्यातील हॉटेल डब्लू येथे हा विवाहसोहळा पार पडला.
-
राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्न सोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
-
लग्नासाठी राहुलने आकाशी रंगाचा सूट तर ईशानीने लेहेंगा परिधान केला होता.
-
मेहेंदी सोहळ्यातील फोटो.
-
‘मेहेंदीच्या रंगानी पहिला दिवस रंगला’, असे कॅप्शन देत मेहेंदी सोहळ्यातील फोटो राहुलने शेअर केले आहेत.
-
मेहेंदीसाठी राहुलने केशरी रंगाचा सूट परिधान केला होता.
-
तर पांढऱ्या रंगाचा फ्लोरल लेहेंगा आणि केसात माळलेल्या गुलाबाच्या फुलांमुळे ईशानीचं सौंदर्य खुलून दिसत होतं.
-
ईशानी फॅशन डिझायनर असून ते दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
-
२०१९ मध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
-
राहुलच्या लग्नासाठी दीपक चहर होणारी पत्नी जया भारद्वाजसोबत उपस्थित होता.
-
लग्नसोहळ्यातील खास क्षण.
-
आयपीएलचा १५व्या हंगामात राहुल चहर पंजाब किंग्स संघाकडून खेळणार आहे.
-
(सर्व फोटो : राहुल चहर/ इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल