-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सर्वच लढती अटीतटीच्या होत आहे. प्रत्येक संघ तूल्यबळ असल्यामुळे शेवटच्या षटकापर्यंत संघर्षपूर्ण लढती होतायत.
-
मात्र आयपीएलच्या २०२२ सालच्या हंगामात आतापर्यंत अशा काही लढती झाल्या आहेत, ज्यांची खास नोंद करावी लागेल.
-
महेंद्रसिंह धोनी फिनिशर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने या हंगामात मुंबई इंडियन्सविरोधात खेळताना धडाकेबाज फलंदाजी केली होती. या सामन्यात सहा चेंडूंमध्ये १६ धावांची गरज होती. त्याने शेवटच्या चार चेंडूंमध्ये चौकार आणि षटकार लगावत १६ धावा करत चेन्नईला विजय मिळवून दिला होता.
-
त्यानंतर गुजरात टायटन्सचा दिग्गज फलंदाज डेविड मिलर यानेदेखील चेन्नईविरोधात खेळताना धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्याने फक्त ५१ चेंडूंमध्ये ९४ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने सहा षटकार लगावले होते. मिलरच्या फलंदाजीमुळे गुजरातचा तीन विकेट्सनी दणदणीत विजय झाला होता.
-
कोलकाता नाईट रायडर्सचा दिग्गज फलंदाज पॅट कमिन्स यानेदेखील अशाच प्रकारे खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्याने मुंबई इंडियन्सविरोधात खेळताना अवघ्या १५ चेंडूमध्ये ५६ धावा केल्या होत्या. मैदानावर फलंदाजीसाठी आल्यानंतर त्याने चार चौकार आणि सहा षटकार लगावले होते.
-
गुजरात टायटन्स संघाकडून खेळणारा राहुल तेवतिया सध्या फिनिशर म्हणून नावारुपाला येत आहे. त्याने पंजाबविरोधात खेळताना गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला होता. त्याने शेवटच्या दोन चेंडूंमध्ये दोन षटकार लगावत संघाला विजयापर्यंत नेले होते. हा सामना पाहताना प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
-
कोलकातानेही पंजाब किंग्जविरोधात खेळताना रोमहर्षक विजय मिळवला होता. या विजयासाठी आंद्रे रसेलने मोठी मेहनत घेतली होती. त्याने ३१ चेंडूंमध्ये ७१ धावा करुन केकेआरला विजयापर्यंत नेलं होतं. फलंदाजी करताना त्याने ८ षटकार लगावले होते. पंजाब सामना जिंकणार असे वाटत असताना आंद्रे रसेलने मोठे फटके लगावत केकेआरला एकहाती विजय मिळवून दिला होता.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल