-
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आता राज्यसभेचा खासदार झाला आहे.
-
आम आदमी पार्टीचा राज्यसभा सदस्य म्हणून त्याने खासदारकीची शपथ घेतली.
-
पारंपरिक पंजाबी पगडी परिधान करून संसदेत पोहचलेल्या हरभजनने पंजाबी भाषेत शपथ घेतली.
-
शपथ घेतल्यानंतर खासदार हरभजन सिंगने राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी मतदानही केले.
-
सहकारी खासदार संजीव अरोरा आणि राघव चढ्ढा यांच्यासोबत हरभजन सिंग संसदेत दाखल झाला होता.
-
विशेष म्हणजे एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाची ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या गौतम गंभीर सोबत तो आता एकाच सदनामध्ये बसणार आहे.
-
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने हरभजन सिंगच्या नावाची राज्यसभा सदस्यत्वासाठी घोषणा केली होती.
-
आता खासदार असलेल्या हरभजन पंजाब पोलीस दलामध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून देखील काम केलेले आहे.
-
आता खासदार म्हणून हरभजन सिंग कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. (फोटो सौजन्य – पीटीआय/ट्विटर)
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या