-
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमधील भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात भाजपाने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं.
-
पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांचं आव्हान भारताने पाच गडी राखून गाठलं. या सामन्यात भारताचे पहिल्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
-
मात्र, मधल्या फळीतील रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या या जोडीने कमाल करत भारतासाठी विजय खेचून आणला.
-
दरम्यान, या सामन्यातील विजयामुळे भारताने टी-२० विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला असे म्हटले जात आहे.
-
या सामन्याव्यतिरिक्त भारत-पाकिस्तान यांच्यात आणखी दोन वेळा लढत होऊ शकते.
-
आशिया चषक स्पर्धेत ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन गट पाडण्यात आलेले आहेत.
-
येत्या ३१ ऑगस्ट रोजी भारत-हाँगकाँग यांच्यात लढत होणार आहे. तसेच २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान-हाँगकाँग अशा समना होईल.
-
हे दोन्ही सामने भारत आणि पाकिस्तान यांनी जिंकले तर हे दोन्ही संघ ४ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात.
-
हे दोन्ही संघ बलशाली असल्यामुळे ते १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यातही आमनेसामने येऊ शकतात.
-
त्यामुळे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान आणखी दोन वेळा एकमेकांसमोर येऊ शकतात.
-
आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघांत एकूण १४ लढत झालेली आहे. त्यापैकी भारत ८ वेळा विजयी झाला आहे.
-
तर पाकिस्तानला ५ वेळा विजय मिळवता आलेला आहे. एक सामना अनिर्णित राहिलेला आहे. (सर्व फोटो ट्विटरवरून साभार)

Dead Economy: डोनाल्ड ट्रम्प यांना थेट अणु हल्ल्याची धमकी; ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटल्याने रशियाचा संताप