-
भारतीय संघ २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे पाच भारतीय खेळाडू आहेत. यातील दोन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे.
-
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. आशिया चषकानंतर कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. भारतीय संघासाठी ही दिलासा देणारी गोष्ट आहे. त्याने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध १९ सामन्यांत ९१८ धावा केल्या आहेत.
-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. धवन सध्या भारतीय टी-२० संघातून बाहेर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ सामन्यांत ३४७ धावा केल्या आहेत.
-
रोहित शर्मा हा भारतीय संघातील फलंदाजीचा महत्त्वाचा दुवा आहे. कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची त्याची क्षमता आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ सामन्यात ३१८ धावा केल्या आहेत.
-
महेंद्रसिंग धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सामन्यांत ३१३ धावा केल्या आहेत. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
-
भारताचा स्टार फलंदाज आणि सिक्सर किंग युवराज सिंगने २०१९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० सामन्यात २८३ धावा केल्या आहेत.

CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?