-
IND vs PAK: टी-२० विश्वचषकात २३ ऑक्टोबर रोजी पांरपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानचे पाच खेळाडू भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
-
मोहम्मद रिझवान सध्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारी पहिल्या स्थानावर आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून शेवटच्या १० सामन्यात त्याने ६ अर्धशकते झळकवली आहेत.
-
शाहीन आफ्रीदी दुखापतीमुळे आशिया चषकातून संघबाहेर असलेल्या शाहीन आफ्रीदीचे पुन्हा संघात आगमन झाले आहे. ऑस्ट्रेलियातील वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर शाहीन आफ्रिदी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
-
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारीस रौफही १५० किमी/प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. आशिय चषक आणि इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत रौफही चांगले प्रदर्शन केले आहे.
-
ऑलराऊंडर मोहम्मद नवाजही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत नवाजने उत्तम प्रदर्शन करत न्युझीलंडला मात दिली होती. आशिया चषकातही त्यांनी पाकिस्ताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
-
कर्णधार बाबर आझम सध्या फॉर्ममध्ये नसला, तरी तो भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. तो सध्या आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.

ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?