-
मार्च महिन्यामध्ये सुरू होणारी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल चर्चेत आहे. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)
-
असंख्य क्रिकेटप्रेमी या लीगमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंना उत्सुकतेने सपोर्ट करतात. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)
-
आयपीएल भारतातच नाही तर जगभरात चर्चेत असते आणि नानाविध कारणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)
-
आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सामिल होतात. पण 2024च्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे विश्राम देण्यात आला आहे. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)
-
बहुतेकदा हा निर्णय टीमसाठी धोक्याचा असतो. यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूंना विश्राम दिला आणि त्याजागी कोणत्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे जाणून घेऊया. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)
-
इंग्लंडचा मार्क वुड मध्ये दुखापतीच्या कारणामुळे यंदा लखनौ सुपर जायंट्सनचा भाग नसेल. (फोटो: मार्क वुड अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
मार्क वुडच्या जागी लखनौ सुपर जायंट्सने शामर जोसेफला संघात सामिल केले आहे. (फोटो: शामर जोसेफ अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
गोलंदाजीसाठी मोहम्मद शमी हा गुजरात टायटन्सचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे परंतु अलीकडेच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्याला आयपीएल 2024मध्ये खेळता येणार नाही. (फोटो: मोहम्मद शमी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन दुखापतीमुळे 2024चे आयपीएल खेळणार नाही. (फोटो: गस ऍटकिन्सन अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
कोलकाता नाईट रायडर्सने ॲटकिन्सनच्या जागी वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला एक कोटी रुपयांसह करारबद्ध केले आहे. (फोटो: दुष्मंथा चमीरा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलच्या आधी मोठा धक्का बसला आहे कारण त्यांचा स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे देखील या आयपीएलमध्ये खेळणार नाही. (फोटो: डेव्हन कॉनवे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्षांना कसं सांगणार? दादरमध्ये कबूतर खान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा