-
भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल आपल्या कसोटी सामान्यामधील कामगिरीसाठी खूप कौतुक गोळा करत आहे. आपल्या कामगिरीच्या बळावर यशस्वी जैस्वालने पुन्हा एक नवीन विक्रम आपल्या नावावर नोंद केला आहे.(फोटो : यशस्वी जैस्वाल अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
गुरुवारी झालेल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने १००० धावा पूर्ण केल्या आणि या कामगिरीसह तो सर्वात जलद हजार कसोटी धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. (फोटो : यशस्वी जैस्वाल अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
हा २२ वर्षीय खेळाडू यशस्वी जैस्वाल आता कसोटीत 1000 धावांचा टप्पा पार करणारा चौथा सर्वात तरुण फलंदाज आहे. (फोटो : यशस्वी जैस्वाल अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत. (फोटो : यशस्वी जैस्वाल अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी या यादीत पहिल्या स्थानावर आहे त्याने केवळ 14 डावांमध्ये 1,000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. (फोटो : विनोद कांबळी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
डावांच्या बाबतीत जैस्वाल हा दुसरा सर्वात वेगवान खेळाडू आहे.(फोटो : यशस्वी जैस्वाल अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
चेतेश्वर पुजारा हा सर्वोत्तम कसोटीपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने कसोटी संघात राहुल द्रविडच्या स्थानावर स्थान मिळवून 18 डावात 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत. (फोटो : चेतेश्वर पुजारा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
मयंक अग्रवालने कसोटी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात उत्तम कामगिरी करून त्याने भारतासाठी केवळ 19 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. (फोटो : मयंक अग्रवाल अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
भारताच्या माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फक्त 21 डावात 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत ज्यामुळे ते या यादीत पाचव्या स्थानावर आहे. (फोटो : यशस्वी जैस्वाल अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
या यादीत सचिन तेंडुलकर, कपिल देव, रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर यांसारख्या दिग्गजांचे नाव देखील सामील आहेत. (फोटो : यशस्वी जैस्वाल अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात