-
भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा केल्या. जयस्वालने या 5 सामन्यात (9 डाव) 712 धावा केल्या आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला.
-
या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याच्या नावावर 1,000 हून अधिक धावा आणि दोन द्विशतके आहेत. जैस्वालच्या या कामगिरीसाठी सर्वांना त्याचं कौतुक आहे.
-
आपल्या खेळाव्यतिरिक्त यशस्वी जैस्वालने आपल्या जीवनात ही आणखी चांगली कामगिरी केली आहे ते म्हणजे आपल्या कुटुंबासाठी घर खरेदी केलं आहे .
-
जेव्हा यशस्वी जैस्वाल क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत आला होता तेव्हा त्याला आझाद मैदानावर तंबूत राहावे लागले होते आणि आता त्याच मुंबईत त्याने कोटींचे ड्रीम होम विकत घेतले आहे.
-
यशस्वी जैस्वाल ला हे चांगले दिवस पाहण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे कारण मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर असणे खूप मोठी गोष्ट आहे.
-
यशस्वी जैस्वालचे नवीन घर अगदी स्वप्नवत आहे. या सुंदर घरासाठी यशस्वी जैस्वालने 5.38 कोटी रुपये खर्च केले आहेत.
-
या घरासाठी यशस्वीचे आई-वडील आणि त्याचा भाऊ अत्यंत आनंदी आहेत कारण या क्रिकेटरने त्याच्या मेहनतीने आपल्या कुटुंबाला एक अनपेक्षित जीवन दिले आहे.
-
यशस्वीच्या कुटुंबाने त्याला त्याच्या उत्कृष्टतेच्या शोधात पाठिंबा दिला आणि अनेक संकटे पाहिल्यानंतर ते खरोखरच या सुखास पात्र आहेत.
-
या शुभ प्रसंगी त्याच्या चाहत्यांनी त्याला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो: यशस्वी जैस्वाल इन्स्टाग्राम अकाऊंट)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS