-
आयपीएल भारतात अत्यंत चर्चेत असते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. क्रिकेट प्रेमी या लीगमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंना उत्सुकतेने सपोर्ट करतात. (फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)
-
आयपीएलमध्ये अनेक खेळाडू सामील असतात. या लीगमधून माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक येणाऱ्या सामन्यासाठी खेळाडूंची चाचणी करतात. (फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)
-
जाणून घेऊया अशा काही खेळाडूंबद्दल जे ठरतील भविष्यात टीम इंडियासाठी सर्वोत्तम. (फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)
-
अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे ने २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज सोबत आयपीएलचा 16 व्या सीझन मध्ये प्रभावी कामगिरी केली होती. मधल्या षटकांच्या टप्प्यात त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी कौशल्यामुळे चेन्नईला जवळपास प्रत्येक सामन्यात चांगल्या धावसंख्या मिळाल्या होत्या. (फोटो: शिवम दुबे/इन्स्टाग्राम)
-
ध्रुव जुरेलने अलिकडेच झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून आपल्या उत्तम कामगिरीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ध्रुव कडे येणाऱ्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देखील असू शकते. (फोटो: ध्रुव जुरेल/इन्स्टाग्राम)
-
2023 मध्ये राजस्थान रॉयल्ससोबत आयपीएलमधून खेळण्यासोबत ते नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यामध्ये यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी आपल्या उत्तम कामगिरीची नोंद केली आहे. (फोटो: यशस्वी जैस्वाल /इन्स्टाग्राम)
-
ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात निवडल्यानंतर दुखापतीमुळे वगळलं गेलं होतं परंतु येणाऱ्या आयपीएलमध्ये त्याच्या कामगिरीने तो नक्कीच यशस्वी पुनरागमन करेल. (फोटो: ऋतुराज गायकवाड/इन्स्टाग्राम)
-
रिंकू सिंगच्या खेळातील प्रवासाबद्दल चाहत्यांनी कौतुक केले आहे. चाहत्यांना येत्या आयपीएलच्या सीझनमध्ये रिंकूच्या सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. (फोटो: रिंकू सिंग/इन्स्टाग्राम)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या रजत पटीदारला एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते.आयपीएलमधून त्याच्या कारकिर्दीमध्ये अजून भर पडू शकते. (फोटो: रजत पटीदार/इन्स्टाग्राम)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…