-
इंडियन प्रीमियर लीग २०२४चा सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ पहिला सामना जिंकून इथपर्यंत पोहोचले आहेत. (Gujarat Titans Fanclub)
-
चेन्नई त्यांच्या मैदानावर सामना खेळणार असली तरी गुजरातचे खास खेळाडू सीएसकेसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. (Shubman/Instagram)
-
गुजरात टायटन्स संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल त्याच्या दमदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सलामी करणाऱ्या शुभमनने आजवर संघासाठी महत्त्वाच्या धावा घेतल्या आहेत. (Mohit/Instagram)
-
अशा स्थितीमध्ये शुभमनची खेळी चेन्नईच्या गोलंदाजांसाठी त्रासदायक ठरू शकते. दरम्यान, आयपीएलच्या गेल्या हंगामात शुभमनने तीन शतक झळकावले होते. (Shubman/Instagram)
-
शुभमनने चेन्नईच्या विरुद्ध सर्वाधिक ६३ धावा केल्या आहेत. तर त्याने चेन्नईविरुद्धच्या ५ सामन्यांमध्ये एकूण १६२ धावा केल्या आहेत. (Shubman/Instagram)
-
चेन्नई विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा महत्त्वाचा सिद्ध होऊ शकतो. डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी करण्यात मोहित शर्मा पटाईत आहे. (Mohit/Instagram)
-
मुंबईविरुद्धच्या सामन्यात मोहितने अप्रतिम गोलंदाजी करत सोळाव्या आणि अठराव्या षटकात दोन बळी घेतले होते. (Mohit/Instagram)
-
रोहित शर्मा आणि टीम डेव्हिडचा विकेट घेऊन त्याने गुजरातला सामन्यात परत आणले होते. (Mohit/Instagram)
-
गुजरातचा युवा फलंदाज साई सुदर्शनही चेन्नई सुपर किंग्जसाठी अडचणी निर्माण करू शकतो. गेल्या वर्षी चेन्नईविरुद्धच्या आयपीएल फायनलमध्ये सुदर्शनने अवघ्या ४७ चेंडूत ९६ धावांची दमदार खेळी करत संघाला २१४ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Sai/Instagram)
-
इतकंच नाही तर त्याने आयपीएल २०२३ मध्ये आठ सामन्यात ३६२ धावा केल्या होत्या. (Sai/Instagram)
-
जगातील सर्वोत्तम टी२० गोलंदाजांपैकी एक लेगस्पिनर राशिद खानमध्ये कठीण काळात संघाला विकेट मिळून देण्याची क्षमता आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत २७ बळी मिळवले होते. (Rashid/Instagram)
-
या हंगामातील मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला एकही बळी घेता आला नसला तरीही गोलंदाजीशिवाय मोठे फटके मारण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे हे विसरून चालणार नाही. (Rashid/Instagram)
-
दोन्ही संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत पांच वेळा समोरासमोर आले आहेत. यात गुजरातचा वरचष्मा आहे. गुजरातने तीन तर चेन्नईने दोन सामने जिंकले आहेत. (Gujarat Titans Fanclub)
-
तथापि, आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत गुजरातला चेन्नईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. (chennaiipl)
-
यावेळी दोन्ही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळत आहेत. गुजरातचे कर्णधारपद शुभमनच्या हाती आणि चेन्नईचे कर्णधारपद ऋतुराजच्या हाती आहे. (chennaiipl)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक