-
शनिवारी रंगलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी एका नवीन विक्रमासह हा सामना जिंकला.
-
सनरायझर्स हैदराबाद हा संघ आयपीएल इतिहासात पॉवर-प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला संघ बनला आहे.
-
सामन्यामध्ये ‘पॉवरप्ले’ अत्यंत महत्वाचा भाग असतो. यामुळे फलंदाजांना जास्त धावा करायची संधि मिळते. ‘पॉवरप्ले’ मध्ये पहिल्या डावाची सहा षटके होण्यापर्यंत ३० यार्ड या वर्तुळाबाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षकांना परवानगी असते. यामुळे सलामीवीरांना जास्ती जास्त धावा करायला मिळतात आणि संघाच्या विजयाची शक्यता देखील वाढते.
-
शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने पहिल्या ६ षटकात १२५ धावा करून त्यांनी केकेआरचा २०१७ मधील सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअरचा विक्रम मोडला.
-
हैदराबादचे सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने ही सर्वोच्च धावांची भागीदारी केली.
-
२०१७ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध पॉवरप्लेमध्ये शून्य विकेट गमावून एकूण १०५ धावा केल्या होत्या.
-
चेन्नई सुपर किंग्स २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिल्या सहा षटकात ९० धावा केल्या होत्या.
-
पॉवरप्लेमध्ये शानदार खेळी करत या आधीही चेन्नई सुपर किंग्सने २०१४ मध्ये पहिल्या सहा षटकात पंजाब किंग्स विरुद्ध १०० धावा केल्या होत्या.
-
(सर्व फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

Today Horoscope Live: शनी देणार प्रचंड पैसा; ३० वर्षानंतर ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभ, जाणून घ्या