-
भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२४ मध्ये ‘कोलकाता नाइट रायडर्स’कडून खेळताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदा केकेआर संघाने आयपीएल २०२४ ची ट्रॉफीही जिंकली आहे. (फोटो : केआर एक्स्ट्रा / X)
-
आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर व्यंकटेश अय्यरने आता आपल्या आयुष्यात देखील नवीन सुरूवात केली आहे. रविवारी २ जून रोजी व्यंकटेश श्रुती रघुनाथनसोबत लग्न बंधनात अडकला. (फोटो : केआर एक्स्ट्रा /X)
-
व्यंकटेश आणि श्रुतीचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा संपन्न झाला होता. व्यंकटेश हा एक प्रसिद्ध क्रिकेटर आहे आणि त्याची पत्नी म्हणजेच श्रुती ही फॅशन मर्चन्डाइस मॅनेजर आहे. श्रुती बेंगळुरू येथील लाइफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करते. (फोटो : केआर एक्स्ट्रा / X)
-
श्रुतीने कोईम्बतूरच्या ‘पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स’मधून बीकॉमचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय तिने ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ (NIFT) मधून फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. (फोटो : व्यंकटेश अय्यर/इन्स्टाग्राम)
-
फॅशनशिवाय श्रुतीला स्पोर्ट्सची ही खूप आवड आहे. श्रुती फॅशन प्रोफेशनल असण्यासोबतच एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू देखील आहे. (फोटो : केआर एक्स्ट्रा / X)
-
श्रुतीने २०२२ साली लँडमार्क बॅडमिंटन लीगमध्ये विजेतेपद पटकावले होते, तर मिक्स्ड डबल्स फेरीत ती उपविजेती होती. (फोटो : व्यंकटेश अय्यर/इन्स्टाग्राम)
-
व्यंकटेश अय्यरबद्दल बोलायचे झाले तर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त त्याने फेब्रुवारी २०२२ भारतीय संघासाठीही खेळला आहे. (फोटो : केआर एक्स्ट्रा / X)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या