-
टी-२० विश्वचषक स्पर्धा सध्या चर्चेत आहे. भारतीय संघाने अमेरिकेत झालेले तिन्ही सामने जिंकून सुपर-८ फेरीत आपले स्थान कायम केले आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघात काही अनकॅप्ड खेळाडू पदार्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल. (फोटो: आयपीएल अधिकृत वेबसाइट)
-
आयपीएल २०२४ सीझनमध्ये अनेक अनकॅप्ड खेळाडूंनी आपल्या उल्लेखनीय कौशल्य आणि कामगिरीचे प्रदर्शन करून अनेकांना प्रभावी केले आहे, ज्यामुळे भारतीय संघाचे ते प्रबळ दावेदार बनू शकतात. (फोटो: आयपीएल अधिकृत वेबसाइट)
-
सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने आयपीएल २०२४ मध्ये ४८४ धावा केल्या आहेत. आगामी मालिकेसाठी अभिषेक शर्मा भारतीय संघात पदार्पण करू शकतो. (फोटो: अभिषेक शर्मा/इन्स्टाग्राम)
-
कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज हर्षित राणाने ११ डावात १९ विकेट्स घेतल्या. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे कौतुक झाले होते. हर्षित राणा आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी भारतीय संघात पदार्पण करू शकतो. (फोटो: हर्षित राणा/इन्स्टाग्राम)
-
पंजाब किंग्जच्या शशांक सिंगने आयपीएलमध्ये १६४.६५ च्या स्ट्राईक रेटने ३५४ धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला आगामी मालिकेत भारतासाठी खेळण्याची संधी मिळू शकते. (फोटो: शशांक सिंग/इन्स्टाग्राम)



