-
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 वर्ल्डकप ट्रॉफी जिंकली आहे. या विजयाचा देशभर जल्लोष केला जात आहे. देशातील जनतेबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चित्रपटसृष्टीतील सर्व बडे सेलिब्रिटी टीम इंडियाचे अभिनंदन करत आहेत. (PTI)
-
दरम्यान, सूर्यकुमार यादवचीही जोरदार चर्चा होत आहे. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सूर्यकुमार यादवला ‘सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ पुरस्कार देण्यात आला. २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल घेतल्याने संपूर्ण सामन्याला कलाटणी मिळाली. (PTI)
-
सूर्यकुमार यादवच्या झेलचे खूप कौतुक होत आहे. जेव्हा त्याला या झेलबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले की, झेल नव्हे तर ट्रॉफी सीमारेषेबाहेर जात असल्याचे दिसत होते. (PTI)
-
दरम्यान, सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या खूप वेगाने व्हायरल होत आहेत. (@ devishashetty_ /Insta)
-
देविशा शेट्टीने ट्रॉफीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी मैदानावर ट्रॉफीसोबत फोटो क्लिक करताना दिसले. (@ devishashetty_ /Insta)
-
तर या छायाचित्रात दोघेही ट्रॉफी शेजारी घेऊन निजलेले दिसले. देविशा शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘यामुळे रात्री चांगली झोप येण्यास मदत होईल’. (@ devishashetty_ /Insta)
-
देविशा शेट्टी खूप सुंदर आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना असून मुंबईत नृत्य प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहे. (@ devishashetty_ /Insta)
-
सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. कॉलेजच्या एका कार्यक्रमादरम्यान सूर्या देविशाच्या प्रेमात पडला. (@ devishashetty_ /Insta)
-
यानंतर दोघेही ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले आणि २०१६ मध्ये लग्न केले. (@ devishashetty_ /Insta) हेही पाहा- PHOTOS : रवींद्र जडेजाची एकूण संपत्ती किती? ‘सहा’ घरांसह आहे कोट्यवधींचा मालक! वाचा म…

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा