-
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारामध्ये मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदक पटकावत इतिहास रचला.
-
थ्री पोझिशन प्रकारामध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
-
स्वप्नील हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवाशी आहे. दरम्यान, स्वप्नील कुसाळे हा पॅरिसवरून आज पुण्यात दाखल झाला.
-
यावेळी स्वप्नीलचं पुणे विमानतळावर आणि पुणे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
-
पुण्यात दाखल झाल्यानंतर स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
-
पुण्यात स्वप्नीलने काही दिवस नेमबाजीचा सराव केला होता. त्यामुळे आज स्वप्नील पुण्यात दाखल झाल्यानंतर पुण्यातील बालेवाडीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
-
याचबरोबर स्वप्नीलचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे. या छायाचित्रात स्वप्नील आणि त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे.
-
स्वप्नीलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं आणि आरती देखील केली. तसेच बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात गन फॉर ग्लोरी नेमबाजी अकादमीच्या वतीने त्याचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्वप्नीलचे अभिनंदन केले.
-
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये थ्री पोझिशन प्रकारामध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
-
(All Photos: Express photo by Arul Horizon. 08/08/2024, Pune)

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल